About Us
पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला १९७० पासून कार्यान्वीत
या केंद्रामध्ये पोलीस खात्यामध्ये नव्याने रुजू झालेल्या पोलीस अंमलदारांना मुलभूत प्रशिक्षणामध्ये पोलीस कर्तव्ये, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळणे, आधुनिक शस्त्रांचे प्रशिक्षण, जनतेच्या जिवीताचे व मालमत्तेचे रक्षण, आणीबाणीच्या व कठीण प्रसंगी कणखर राहणे, उच्चदर्जाची शिस्त आत्मसात करून समपीत पोलीस शिपाई तयार करण्यासाठी त्यांची शारिरीक व बौध्दीक क्षमता वृध्दींगत करण्यात येते.
पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला मध्ये पोलीस शिपार्य, होमगार्ड सेवांतर्गत प्रशिक्षण असे इतर प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात येते.
सन १९७० साली प्रशिक्षण केंद्र स्थापन झाल्यापासून या प्रशिक्षण केंद्रात सदर सत्र क्रमांक ६६ मधील प्रशिक्षणार्थी सह एकुण २८१४० प्रशिक्षणार्थीनी आपले मुलभूत प्रशिक्षण पुर्ण केलेले आहे.
सत्र क्रमांक ६६ मध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध ८ पोलीस घटकातील एकुण ५३१ पैकी ५२० प्रशिक्षणार्थी यांनी मुलभूत प्रशिक्षण पूर्ण केले असुन सर्व प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला यांना केंद्रीय गृहमंत्री यांची उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्रासाठी ट्रॉफी सन २०१६-१७ करीता प्राप्त झाली आहे
- सदर मूलभूत प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थीना बाहयवर्गामध्ये पौटी, पदकवायत्त, ऑब्स्टॅकल्स, धावणे, शस्त्र हाताळणी, गोळीबार सराव, कमांडो ट्रेनिंग इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच आंतरवर्गामध्ये नव्याने लागू करण्यात आलेले मुख्य फौजदारी कायदे, किरकोळ फौजदारी कायदे, गुन्हे शास्त्र व पोलीस कार्यपध्दती, कायदा व सुव्यवस्था, पोलीस संघटन व प्रशासन व संबधीत शासकीय विभाग, पोलीस कामकाजातील विज्ञान व तंत्रज्ञान, प्रात्याक्षीक, भावनिक प्रज्ञावंत या विषया संबंधी अभ्यासक्रम शिकविण्यात आला.
प्रशिक्षणार्थीना परिपूर्ण पोलीस बनविण्यासाठी CCTNS, AMBIS, E-LEARNING, COMPUTER व TRAFFIC MANAGEMENT या पूरक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रशिक्षणार्थी यांच्या प्रशिक्षणासोबतच त्यांना प्रशिक्षण केंद्रातील स्वाद व अन्नपुर्णा भोजनालयामध्ये संतुलीत व सकस आहार पुरविण्यात आला, चालु सत्रात मेस मधील पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्याकरीता अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
प्रशिक्षणार्थी यांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्याकरीता प्रशिक्षण केंद्रामध्ये नियमीतपणे योगासन शिबीरे, वैद्यकीय चाचण्या यांचे आयोजन करण्यात येतात
अकोला जिल्हा हा अति उष्ण वातावरणाचा भाग असुन, प्रशिक्षण केंद्रातील वातावरणामध्ये नियमीत शितलता रहावी याकरीता दरवर्षी प्रशिक्षणर्णी यांचे सहकार्याने व श्रमदानातुन प्रशिक्षण केंद्रामध्ये जवळपास २०० झाडांचे वृक्षारोपन करून परिसर सुशोभिकरण करण्याबाबतची कामे करण्यात येतात,